Posts

Showing posts with the label cooking experiment

Mission पुरण पोळी

Image
  Mission पुरण पोळी.  या आठवड्यात बऱ्याच वेळा dinner पोळी-भाजी गृहातून आणत होते. पुण्यात पोळी भाजी गृहात असे एखादेच महाराष्ट्रीयन व्यंजन असेल जे उपलब्ध नसावे. सलग २ दिवस counter वर cashier आजोबांसमोर पुरण पोळी ची पाकीट तयार ठेवलेली दिसत होती. सहसा मी घरी जाऊनच आईला करायला सांगते पण का माहीत नाही friday night ला मला "पुरण पोळी आता आपण स्वतःच बनवायची" अशी लहर आली. देशपांड्यांकडून फक्त usual dinner घेऊन लगेच माझं preparation सुरु. Bachelor लोकांकडे हरभऱ्याची डाळ काही कारण नसताना आधीच available असणे, शक्यच नाही, so येताना घेतली. एकदा घरात येऊन परत मी बाहेर जाणं हे ही शक्य नाही.  मला कृती माहित असताना देखील घरी येऊन पहिले आईला call केला,पुरण पोळी कधीच स्वतः बनवली नसल्याने थोड्या प्रोत्साहनाची गरज होती. गहण चर्चे नंतर तात्पर्य असं निघालं की, डाळ आधी शिजवायची, मग साखरच टाकायची(गुळामुळे पुरण loose textured होईल, moisture पकडेल, पोळी लाटता येणार नाही वगैरे warnings मिळाल्या), वेलची पुड ही सोबतच टाकायची(ती नेहमी मिरे पूड आणि सुंठ ही टाकते, पण again हे असलं बिसलं bachelor च्या ...