Mission पुरण पोळी

 Mission पुरण पोळी. 


या आठवड्यात बऱ्याच वेळा dinner पोळी-भाजी गृहातून आणत होते. पुण्यात पोळी भाजी गृहात असे एखादेच महाराष्ट्रीयन व्यंजन असेल जे उपलब्ध नसावे. सलग २ दिवस counter वर cashier आजोबांसमोर पुरण पोळी ची पाकीट तयार ठेवलेली दिसत होती. सहसा मी घरी जाऊनच आईला करायला सांगते पण का माहीत नाही friday night ला मला "पुरण पोळी आता आपण स्वतःच बनवायची" अशी लहर आली. देशपांड्यांकडून फक्त usual dinner घेऊन लगेच माझं preparation सुरु. Bachelor लोकांकडे हरभऱ्याची डाळ काही कारण नसताना आधीच available असणे, शक्यच नाही, so येताना घेतली. एकदा घरात येऊन परत मी बाहेर जाणं हे ही शक्य नाही. 


मला कृती माहित असताना देखील घरी येऊन पहिले आईला call केला,पुरण पोळी कधीच स्वतः बनवली नसल्याने थोड्या प्रोत्साहनाची गरज होती. गहण चर्चे नंतर तात्पर्य असं निघालं की, डाळ आधी शिजवायची, मग साखरच टाकायची(गुळामुळे पुरण loose textured होईल, moisture पकडेल, पोळी लाटता येणार नाही वगैरे warnings मिळाल्या), वेलची पुड ही सोबतच टाकायची(ती नेहमी मिरे पूड आणि सुंठ ही टाकते, पण again हे असलं बिसलं bachelor च्या घरात क्वचित च मिळेल). गव्हाचं पीठ soft मळून ठेवायचं.  झालं. याव्यतिरिक्त काही वाढीव कुटाणे करायचे नाही. डाळीच आणि गुळाचं मिश्रण सहसा "पुरण पात्रात" बारीक करून घेतात ते obvious आहे.


Puran Cooked



मी आमच्या अत्यंत useless cooker(थोडा आवाज करायला लागला की शिट्टी आपणंच करून घ्यावी लागते) मधे डाळ शिजवली. जसं आईने mobile ला चुलीत टाक म्हंटलं म्हणुन आपण खरंच टाकत नाही तसंच मी साखर न वापरता गुळंच टाकला(अंगात किडे). पुरण पात्र हे ही bachelor साठी UFO समान असतं. माझ्या हौशी roommate ने असंच एकदा पावभाजी(जी आम्ही अजून बनवतोयच) masher घेऊन ठेवलं ते use झालं "पुरण" बनवण्यासाठी. हे मी fridge मधे ठेऊन दिलं. दुसऱ्या दिवशी पीठ मळून बराच वेळ भिजत ठेवलं होतं. नाही तेंवा कोण व्यक्ती, काय, कुठल्या दिवशी, किती वाजता बोलला - हे लक्षात राहणाऱ्या मजला आज fridge मधलं ते पुरण बाहेर काढून ठेवणे(आईने हे बजावून सांगितलं होतं, पण ती तर रात्री लवकर झोपत जा असं ही बजावून सांगते) लक्षात राहिलं नाही.


dough ball



अजून च शहाणपण म्हणून chilled पुरणाचा ball मी पिठाच्या एका गोळ्यात कोंबला आणि लाटायला सुरुवात केली. पुरण मधेच राहिलं फक्त कडा पसरत गेल्या. Chilled पुरण room temperature ला येईपर्यंत पोळी लाटणे अशक्य आहे हे कळून चुकल्यावर मी ते सगळं बाजूला ठेऊन दिलं, या सगळल्यात भुक लागून गेली, इतक्या मेहनतीने मसाला rice बनवला तो ही आमच्या useless cooker मधे जळाला, वरचा वरचा खाऊन घेतला(आलीया भोगाशी 

असावे सादर).सुदैवाने माझा हा उठाठेव पहायला घरी कोणीच नव्हतं.

पुरण थंड झालं आणि बऱ्याच प्रकारचे filling and enclosing techniques चा प्रयोग करून पोळ्या लाटल्या, एक center मधे तुटली त्याला त्याच्याच कडा कापून लावल्या(काही पोळ्यांना outer side ला सारण पसरत नव्हतं याचं कारण मलाच कळलं नाही, बहुदा पुढल्या वेळी overcome करता येईल).  मी तब्बल ५ पुरण पोळ्या बनवल्या ज्या टम्म फुगल्या, माझ्या या सुगरण moment ला मी camera मधे कैद केलं. 


disk rolling



मला वाटायचं पुरण पोळी बनवणे अवघड असते हा गैरसमज असावा,पण असं मुळीच नाही. मी गुळाचं पुरण बनवलं, consisteny powdered न होऊ देता, greasy ठेवली ते ही chilled, सारण पिठाच्या गोळ्याच्या center ला चिटकून राहिलं, ज्यामुळे कडा नुसत्याच पिठाळ राहिल्या. पुरण नुसतं खाल्लं तर आई बनवते त्यासारखं झालं होतं(taste, not consistency) पण पोळ्या लाटण्यामागचं science जमलं नाही १००%. पीठ vs पुरणाचं सारण हे proportion जमलं नाही. पोळ्या अगदीच पातळ झाल्या आणि सारण कमी. थोडक्यात "Diet पुरण पोळ्या" झाल्या होत्या त्या.


Puran Poli - served



- अशीच  एक खवय्यी बॅचलर 





Comments